ही पांढरी आणि गोड पावडर असून तिचे विशिष्ट गुरुत्व ७.१ आणि वितळणबिंदू ८२०℃ आहे. ती नायट्रिक आम्ल, उष्ण संहत सल्फ्यूरिक आम्ल, अमोनियम ॲसिटेट आणि सोडियम ॲसिटेटमध्ये विरघळते, परंतु पाण्यात विरघळत नाही. १३५℃ तापमानाला स्फटिकजल गमावल्यावर तिचा रंग मखमली होतो. तसेच सूर्यप्रकाशात, विशेषतः ओल्या स्थितीत, तिचा रंग पिवळा होतो.